Uncategorized

युवासेना माथेरान शहराध्यक्षपदी राकेश कोकळे
युवासेनेची तरुणांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी…..

खोपोली- दत्तात्रेय शेडगे

युवासेना माथेरान शहराध्यक्षपदी युवा नेते राकेश कोकळे यांची नुकतीच निवड करण्यात आली माथेरान मधील तरुणांवर युवासेने मोठी जबाबदारी दिली आहे
माथेरान शहरातील तरुण कार्यकर्ते आणि माथेरान धनगर समाजाचे अध्यक्ष असलेले राकेश कोकळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले आहे, त्यांच्या कार्यांची दखल शिवसेनेने घेतली असून त्यांना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवासेना रायगड उत्तर जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे यांनी त्यांची माथेरान शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली,
त्यांना नियुक्ती पत्रक पर्यटन मंत्री मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आले, युवासेना माथेरान शहराध्यक्ष पदी राकेश कोकळे यांची निवड होताच सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर, युवासेना उत्तर रायगड जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, युवासेना कर्जत तालूका अध्यक्ष अमर मिसाळ, माथेरान शहराध्यक्ष मनोज खेडकर आदिसह शिवसैनिक उपस्थित होते

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button