Uncategorized

सानियो स्पेशल स्टील द्वारा रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त बाईक रॅली आणि पथनाट्य जनजागृती.३७ वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह २०२६

खोपोली – प्रतिनिधी

खोपोली दि. १७ जानेवारी २०२६, सानियो स्पेशल स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारा राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह अभियान अंतर्गत रॊड सेफ्टी रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

बाईक रॅलीचा मार्ग कंपनी ते खोपोली बाजारपेठ मार्गे पोलीस स्टेशन, बस स्थानक ते पुन्हा कंपनी असा होता. सानियो स्पेशल स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी “सुरक्षा यमाच्या दरबारी” या विषयावर कंपनी आणि खोपोली बसस्थानक येथे पथनाट्य सादर केले.

पथनाट्यातून वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेज आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेंद्र आरोळे, जिल्हा वाहतुक शाखा, खोपोली युनिट यांनी अपघात प्रसंगी जखमीना मदत करण्याचे आवाहन केले तसेच वाहतुक नियमांची सविस्तर माहिती दिली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.दिलीप पाचपांडे यांनी उपस्थित कामगारांना रस्ते सुरक्षा खूप महत्वाची आहे, ह्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास कंपनीचे कार्यकारी संचालक श्री. हिरोकाझू सुझुकी, उपाध्यक्ष श्री. तान्हाजी पठारे, सी.ओ.ओ. श्री. मिशिमा काझुया तसेच सर्व युनिअन पदाधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी व कामगार आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णा निकाळजे, सहायक उपनिरीक्षक श्री. तांडेल, हेड कॉन्स्टेबल श्री. राठोड, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सोर इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन सेफ्टी विभागाचे सिनियर मॅनेजर श्री प्रशांत जगदाळे यांनी केले.


पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन संजय म्हामुणकर यांनी केले आणि त्यामध्ये सुंदर असा पोवाडा बाल शाहीर चिरंजीव शौर्य हेमंत निंबाळकर व संतोष गाडीगावकर यांनी सादर केला.


पथनाट्यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी चव्हाण मॅडम आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे यांनी कंपनीने केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. सानियो स्पेशल स्टीलचे सर्व कर्मचारी व कामगारांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button