Uncategorized

गारमाळ शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न….अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न….

खोपोली- दत्तात्रय शेडगे

रायगड जिल्हा परिषद शाळा गारमाळ या शाळेत प्रजाकसत्ता दिनाचे औचित्य साधतं सांस्कृतिक कार्यक्रम आणि विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला,
अतिशय दुर्गम भागात घाटमाथ्यावर रायगड जिल्हा परिषद शाळा गारमाळ ही शाळा असून या शाळेत 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजाकसत्ता दिन उत्सहात साजरा करून झेंडा फडकावून साजरा केला तर येथील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगली भाषने आणि नृत्य कला सादर केल्या
तर शालेय पातळीवर आयोजित केलेल्या विविध स्पर्धे मध्ये क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने आयोजन केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ डमाले शिक्षिका सविता दरशेवाड अंगणवाडी शिक्षिका सुनंदा भोसले, मदतनीस रुपाली चिंचावडे, रोहिदास चिकटवाड यांचे विशेष आभार ग्रामस्थांनी मानले आहेत


यावेळी चावणी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुखदेव भोसले, युवा नेते संदीप चिंचावडे, जेष्ठ नागरिक गबलू भोसले, नारायण शेडगे, सटू कोंडभर, गणपत कोंडभर, मारुती शेडगे तुकाराम आखाडे, विष्णू चिंचावडे संतोष चिंचावडे, संतोष तिकोणे, तुकाराम आखाडे, निलेश चिंचावडे संदीप तिकोणे, आदिसह अनेक ग्रामस्थासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button