खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून अँड गणेश आखाडे इच्छुक…
धनगर समाजाची निर्णायक मते…

खोपोली- दत्तात्रय शेडगे
खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा मधून सुशिक्षित आणि तरुण असलेले अँड गणेश तुकाराम आखाडे हे निवडणुक लढविणार आहेत, त्यांना या प्रभाग क्रमांक 13 मधून धनगर समाजाचा पाठींबा मिळत आहे या वार्ड मध्ये धनगर समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांची भूमिका महत्वाची आहे
खोपोली नगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसावर आली असून ही नगरपालिका आपल्या ताब्यात येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसाधारण महिला आणि ओबीसी पुरुष असे आरक्षण पडल्याने या प्रभागात धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे , त्यामुळे या वार्ड मध्ये धनगर समाजाची महत्वाची भूमिका असून ती निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे या वार्ड मधील सुसुक्षित तरुण,आणि तडफदार असलेले अँड गणेश तुकाराम आखाडे यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी समाजाने केली आहे
अँड गणेश आखाडे हे या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी वार्ड मधील प्रत्येकाच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून या वार्ड मधील धनगर समाजाचा आणि मतदारांचा वाढता पाठींबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे
त्यांनी निवडणुक पूर्ण ताकतिने लढवावी अशी मागणी धनगर समाजाने केली आहे
