चौक जिल्हा परिषद वार्ड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून बालेकिल्ल्याचं राहणार – जिल्हाप्रमुख मनोहर भोईर चौक विभागाचा खरा सेनापती हा विभागप्रमुख प्रफुल विचारे हाच, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांचे उद्गार

खालापूर – प्रतिनीधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने मोठी मोर्चेबांधणी केली असता चौक जिल्हा परिषद वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चेबांधणीवर भर दिला असता याच निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या मुख्य आयोजनातून 29 ऑक्टोंबर रोजी वावरले येथे पार पडल्याने या बैठकीला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली करीत निष्ठावंतांची ताकद या वार्डात दाखवून दिली. तर चौक जिल्हा परिषद वार्ड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पुढील काळात हा बालेकिल्लाच राहणार यासाठी निष्ठेने काम करा असे आवाहन जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, संतोष खांडेकर, युवासेना उपजिल्हा अधिकारी तथा शिरवली सरपंच महेश पाटील, उरण विधानसभा समन्वयक विपुल पारठे, कलोते पंचायत समिती विभागप्रमुख तुलसीराम पाटील, मनोहर देशमुख, बाजीराव दळवी, दामू खैर, कमल भस्मा, भाई पाटील, दिनेश महाडिक, अनिल पिंगळे, उत्तम भोईर, अंकुश पवाली, विलास चाळके, राजेंद्र चोरगे, शिवाजी पाटील, जगदीश शेटे, रामदास काईनकर, बबलू मुकादम, संजय धनावडे,, उमेश कदम, किशोर झोरे, सुनील प्रबळकर, सुदेश म्हागावकर, विष्णू खैर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
चौक जिल्हा परिषद वार्डावर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याने या ठिकाणच्या वार्डाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबोधले जाते, मात्र बालेकिल्लाला दृष्ट लागून सत्तांतरानंतर अनेकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असला तरी बहुसंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाचे वर्चस्व ठेवण्यासाठी याठिकाणी मोठी मोर्चे बांधणी केली असता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक वावरले येथे पार पडल्याने या बैठकीतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा रणशिंग फुंकत या बालेकिल्ल्यात आपली ताकद दाखवण्यासाठी एक दिलाने काम करूया असे आव्हान शिवसैनिक व युवासैनिकांनी केल्याचे पाहायला मिळाले.
तर यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, आदिवासी समाजाचे नेते दामू खैर व कमल भस्मा यांनी आपल्या लोकप्रतिनिधीच्या काळात संधीच सोनं करीत आदिवासी समाजापर्यंत शासनाच्या योजना पोचून त्याचा लाभ सर्वसामान्यांना करून दिला. तर विरोधकांनी आमचे हाल करण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते इतके श्रीमंत आहेत की त्यांना कशाचीच कमी पडत नाही, निष्ठावंतांची श्रीमंती त्यांच्याकडे आहे, त्यामुळे जे गेलेत ते गरीब होते. तर आमच्याकडे निष्ठावंतांची श्रीमंती असून लढण्याची श्रीमंती आहे, त्यांच्या जीवावर निवडणूक लढवून जिंकणार असे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे म्हणाले.
तसेच उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या नेतृत्वाखाली हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी काय करायला लागणार ते करायला आम्ही वरिष्ठ तयार असून सर्वांनी मतदार यादीवर काम करत जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू खैर यांना विजयी करत आपली ताकद ओळखून निवडणूक लढवून जिंकण्यासाठी सज्ज व्हा.
तसेच जिल्हाप्रमुख मनोहर भोईर पुढे बोलताना म्हणाले की, या विभागाचा खरा सेनापती हा विभागप्रमुख प्रफुल विचारे हाच आहे, प्रफुल्ल विचारे याला अनेक त्रास झाला असतानाही डगमगला नाही. पण त्या त्रासाला न भिता खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याने त्याला शिवसेना व येथील शिवसैनिक कधीच विसरणार नाही. तसेच चौक जिल्हा परिषदेच्या उमेदवार वैशाली विष्णू खैर यांचे समाजात चांगले काम असून त्यांना येथील जनता निवडून देत समाजसेवा करण्याची संधी देईल. तर आदिवासी समाज कुठेही मागे राहिला नसून शिक्षणातही पुढे असल्याने या समाजातील नेतृत्वाला समाजाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने या संधीचे सोने करतील, तर चौक जिल्हा परिषद वार्ड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून बालेकिल्लाच राहील असे जिल्हाप्रमुख भोईर म्हणाले.
