कन्या जन्माचे स्वागत : सहज सेवा फाउंडेशन व सहज महिला फाउंडेशनच्या कन्या सन्मान उपक्रमाचा १०० वा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहज सेवा फाउंडेशन व सहज महिला फाउंडेशनच्या वतीने खोपोली परिसरातील रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या कन्यारत्नाचे स्वागत करण्याचा उपक्रम दिनांक 08 मार्च 2025 पासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत कन्या जन्मल्यावर मातेला अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून दिनांक 05 मार्च 2026 रोजी या उपक्रमातील 100 व्या मातेला सन्मानित करण्याचा मान अजीमुननिशा शाहरुख खान यांना मिळाला आहे. कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत करण्याची ही संकल्पना समाजात मुलींबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी आणि “मुलगी हीच घराचे सौभाग्य” हा संदेश देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. त्या आनंदात सहभागी होत नवजात बालिकेचे स्वागत करणे, मातेला शुभेच्छा देणे आणि तिच्या मातृत्वाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे तसेच सहज महिला फाउंडेशन,खोपोलीच्या अध्यक्षा निलम विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचे नेतृत्व सागरिका योगिता शेखर जांभळे करत आहेत. समाजात कन्या जन्माचा आनंद साजरा व्हावा आणि मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक संदेश जावा, या हेतूने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
आज झालेला 100 वा सन्मान हा या उपक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, पुढील काळातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सहज सेवा फाउंडेशनच्या व सहज महिला फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
१०० व्या सन्मान उपक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे,डॉ.धनंजय किसवे,डॉ.सना,सिस्टर राखी गिरी,सिस्टर शोभा पाचारणे,सिस्टर वंदना पाटील,सिस्टर शिल्पा पेमारे,सिस्टर शुभांगी ओहोळ,सिस्टर वैशाली खंडागळे व सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार तसेच सहज महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा निलम पाटील,संघटिका रेश्मा जुनगरे,उपक्रम प्रमुख सागारिका जांभळे आणि नगरसेवक विनायक तेलवणे उपस्थित होते.
हा उपक्रम सातत्यपूर्ण राबविनार असुन या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार या उपक्रमाच्या उपक्रम प्रमुख सागारिका जांभळे यांनी मानले आहेत.


