Uncategorized

सुभाष नगरचा ५० वर्ष जुना रस्ता कायम ठेवा, ग्रामस्थांची खोपोली नगरपालिकेत धडक.

सुभाष नगर ग्रामस्थांनी नवीन पर्यायी रस्त्याला दिनांक ११ डिसेंबर २०१९ रोजी विरोध केला होता तत्कालीन मुख्याधिकारी यांनी लोकांचा आक्रोश बघून त्याचे गांभीर्य ओळखून या पर्यायी रस्त्याचे काम ताबडतोब थांबवले होते. ५० वर्ष जुना हा रस्ता कायमस्वरूपी सुभाषनगर साठी करण्यात यावा व या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच या रस्त्यास खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व सुभाष नगर येथील त्यांच्या घरा समोरील चौकस जाधव मामा चौक असे नाव देऊन सुशोभीकरण करून नामकरण करण्यात यावे ही आग्रही मागणी केली.

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि सखाराम गेणू जाधव या सर्वांनी एकत्ररित्या २०-२५ वर्ष खोपोली नगर परिषदे मध्ये खोपोली शहराच्या जडण घडनेत विकासाचे काम केले अशा सर्वांनी स्वर्गीय सखाराम गेणू जाधव सहकारी व मित्र परिवार म्हणून व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील हा रस्ता व याचे नामकरण करण्याचे समर्थनार्थ पत्र तत्कालीन मुख्याधिकारी यांची दिले आहे.

३० जानेवारी २०१९ रोजी झालेल्या खोपोली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १०४ मंजुर करून हा ५० वर्ष जुना रस्ता सर्वानुमते सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्यात आला.

डांबरीकरण्याचे कामाची सुरुवात झाली पण यातील अजून तीन रस्त्यांचे डांबरीकरण्याचे काम अद्याप झाले नाही. या रस्त्या संदर्भातील पाठपुरावा आज देखील करत आहेत.

खोपोली नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्ररूब शहर विकास आराखडा (डी. पी. प्लॅन) मध्ये आम्ही ७ ते १२ मार्च २०२५ रोजी सर्व हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींच्या सुनावणी २३ ते २५ जून रोजी पार पडल्या त्या वेळ देखील आम्ही सुनावणीला उपस्थित राहून या संदर्भातील ठरावाचे कागदपत्रे जमा करून आमच्या हरकती व मत नोंदवले आहे.

याच शहर विकास आराखडा (डी. पी. प्लॅन) मध्ये आता ५० वर्ष जुना रेल्वे गेट/ मस्को गेट ते मस्को स्टाफ कॉलनी रस्ता आता १८ मीटर करूनघेत लौजीच्या नवीन रहिवाशी झोन मध्ये जोडला गेला आहे. तसेच जाधव मामा यांच्या घरा समोरील जाधव मामा चौक सुभाष नगर पासून पोस्ट ऑफीस बिल्डिंग पर्यंतचा रस्ता व जे. सी. एम. एम. स्कूल ते स्टाफ कॉलनी सर्कल पर्यंतचा रस्ता १२ मीटर करण्यात आला होता.

हे रस्ते नागरिकांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना व रहदारी साठी सोईस्कर असतांना नवीन पर्यायी रस्त्यासाठी एवढा आठहास का. जुने असलेले कंपनीचे कंपाऊंड त्याला लागून असलेले सुभाष नगरसाठीचे रस्ते सोडून किती मीटर वर नवीन कंपाऊंड वॉल बांधणार, गावात असलेल चार मोठे नाले जे पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात डोंगरातील धबधब्याचे पाणी वाहून नेतात त्याचे नियोजन काय व इतर अनेक समस्यांची साधी चर्चा देखील कुणी ग्रामस्थांची केली नाही.

आता मस्को कॉलनी- जगदीश नगर (महिंद्रा कंपनी कॉलनी) मधील सर्व रहिवाशी बिल्डिंग पाडण्यात आल्या आहे. त्या ठिकाणी नवी प्रोजेट येत आहे असे समजते काय ते अद्याप माहीत नाही. संपूर्ण जागेचे लेवलिंगचे काम सुरी आहे पडलेल्या बिल्डिंगचा मलबा उचलून दुसरी कडे टाकण्याचे काम चालू आहे. मस्को कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष देखील आहेत त्यातील काही वृक्ष ५० वर्षा पेक्षा जुनी आहेत त्यांची ही कत्तल डेव्हलपमेंटच्या नावावर करणार का.

त्यात आता कंपाऊंड वॉलचे काम सुरु करण्यात आले आहे. सुभाष नगर ग्रामस्थांचा ज्या नवीन पर्यायी रस्त्याला विरोध आहे तोच रस्ता तयार करून ५० वर्ष जुना रस्ता बंद करण्याचा घाट घातला जात आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ नवी जी काही डेव्हलपमेंट होणार आहे त्याला आमचा अजिबात विरोध नाही. पण या माध्यमातून आमची घर दार उध्वस्त होतील.

आधी सुभाष नगर गावाला लागून असलेले डोंगरातील कडा पडणार म्हणून गाव दरडग्रस्थ घोषित केले, शहर विकास आराखडा (डी. पी. प्लॅन) मध्ये जे. सी. एम. एम. स्कूलच्या मागेच आणि गावच्या मध्ये घण कचऱ्याचे (डम्पिंग ग्राउंड) आरक्षण टाकले गेले होते, त्यानंतर आता ५० वर्ष जून रस्ता बंद करून संपूर्ण सुभाष नगर गाव येथून उठवण्याचा हा खूप मोठा प्रयत्न सुरू केले आहे.

याच महिंद्रा कंपनीत आमचे वाड वडील काम करत होते आज आमची तिसरी पिढी इथे आहे बरेच जन याचा कंपनी मधे काम करतात व त्याचे मुल बाळ कंपनीच्या शाळेत आजही शिकतात. डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाहीच पण त्यात स्थानिक म्हणून आम्हाला देखील कामे मिळाली पाहिजेत त्यासाठी आम्हाला देखील प्राधान्य दिले पाहिजे

नवीन पर्यायी रस्ता हा डोंगराच्या आड बाजूने आहे त्या ठिकाणी मोठी डेव्हलपमेंट होणार असे काही नाही. आज आमच्या माता भगिनी पहाटे सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिस कंपनी मध्ये तालुक्यात व खोपोली बाहेर एकटी चालत किव्हा स्कूटी वर सुभाष नगर ते गुडलक नॅशनल हायवे पर्यंत व परत सायंकाळी रात्री बे रात्री एकटी बिंदास तशीच परत येऊ शकते. आज ज्या घटना घड़तायत त्या आपण ऐकतोय मौबाईल टीव्ही वर बघतोय त्या अनुषंगाने नवी पर्यायी रस्त्याने येणे फार कठीण व धोक्याचे होणार आहे. हा नवी रस्ता शाळे पर्यंत डेड एंड आहे म्हणजे पुढे न जाणारा अशातच या नवीन पर्यायी बंदिस्त रस्त्यावरून उद्या आपत्कालीन परिस्थितीत ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड काशी गावा पर्यंत पोचू शकेल हा ही मोठा प्रश्नच आहे.

शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व सुभाष नगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची भेट घेऊन तसे निवेदन देऊन चर्चा देखील केली. कामाचा दिवस असताना तसचे रमजान महिन्याचे उपवास असताना देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांची या वेळी कळले ही ५० वर्ष जुना रस्ता कायमचा रद्द केला आहे.

जो पर्यंत आमचा हा रेल्वे गेट/ मस्को गेट ते सुभाष नगर जाधव मामांच्या घरापर्यंतचा ५० वर्ष जून रस्ता कायमस्वरूपी करण्यात येत नाही तो पर्यंत महिंद्रा ॲन्ड महिंद्रा जगदीश नगर/ मस्को कॉलनी (महिंद्रा कंपनी कॉलनी) येथील जागेवर असलेला झोन बदलू नये तसेच बांधकाम करण्यासाठी कुठलीही परवानगी देण्यात येऊ नाही. सुरू असलेले वॉल कंपाऊंडचे काम व इतर कामे तत्काळ थांबवावे ही नम्र पणे विनंती केली.

नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे सुभाष नगर ग्रामस्थांच्या या लढ्या कडे पूर्णपणे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. तसे न झाल्यास २०१९ सारखं सुभाष नगर ग्रामस्थांचा उद्रेख आंदोलन, उपोषण व रस्तारोखोच्या माध्यमातून आमच्या न्याय हक्का साठी झाल्यास आपण व खोपोली नगर परिषद जबाबदार असाल व आम्ही सर्व ग्रामस्थ नाईलाजास्तव आपले कुटुंब घेऊन नगर परिषदेच्या या इमारती मध्ये राहण्यास यावे लागेल असा इशाराच सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रायगड जिल्हा सरचिटणीस राहुल सखाराम जाधव यांनी दिला आहे.

Oplus_131072

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button