शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या

खोपोली – प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे (वय -४५) सकाळी मुलींना शाळेत सोडवून घरी जाताना त्यांच्या मोटारसायकल धडक देवून रस्त्यात आडवले, त्यानंतर डोक्यावर कुर्हाड, कोयता आणि तलवारीने डोक्यात सपासप वार करून चिंधड्या उडवल्याची घटना शुक्रवार दि.26 डिसेंबर 6.45 वाजता घडली आहे. घटनेची माहीती खोपोली शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली असून महिला आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आक्रोश करीत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे. सकाळपासून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित पवार पक्षाचे रविंद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुणाच कटासाठी सहकार्य केल्याचा आरोप अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोपोली शहरात नगरपलिकेची निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत प्रभाग 2 मधून मानसी मंगेश काळोखे विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. यावेळी प्रभागात किरकोळ वाद झाल्याची घटना घडली. या वादावर त्यावेळेस पडदा ही पडला होता. मात्र हा वाद पुन्हा उफाळून आला आणि दि. 26 डिसेंबर सकाळी मंगेश काळोखे आपल्या मुलींना जनता विद्यालयात शिशु मंदिरला सोडून पुन्हा आपल्या घरी साईबाबानगर येथे मोटारसायकलने जात असताना मारेकऱ्यांनी विहारी गावाजवळ आल्यावर गाडी आडवी टाकून ठोकर मारली. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, आपल्या बाबतीत काहीतरी वेगळे घडणार. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी धावत काही अंतरावर आल्यावर विहारी चौकात मारेकऱ्यांनी काळोखे यांना गाठून

धारधार शस्त्र वापरून मंगेश काळोखे यांच्यावर सपासप वार करून जागीच ठार केले. आणि मारेकरी निघून गेली, ही बातमी वाऱ्या सारखी पसरल्याने मोठा जनसमुदाय खोपोली शहरात दाखल झाला, यावेळी खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
साईबाबानगर महिलांनी खोपोली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत आमचा देव गेला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी आक्रोश केला. शहरात तणावपूर्ण वातावरण पसरल्याने पोलीस अधिक्षक आचल दलाल, सहाय्यक अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे, गुप्तहेर खात्याची जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असून तपास यंत्रणेसाठी फ़ॉरेन्सि लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
तर महिला आणि युवकांनी खोपोली पोलिस ठिय्या आंदोलन केल्याने पोलिस तपासात सहकार्य करण्याची विनंती पोलीस अधिक्षक आचल दलाल यांनी केले, मात्र महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दोन वेळा मुंबई पुणे जुना महामार्ग आडवला. यावेळी महिला पोलिस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्यावर वातावरण काहीकाळ तणावपूर्व होते.
तर मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलींना शिशुमंदिर स्कुल येथे सोडुन परत येत असताना सकाळी 7 वा. च्या सुमारास जया बार समोरील चौकात, विहारी खोपोली येथे आले वेळी दर्शन रविंद्र देवकर, सचिन संदिप चव्हाण व इतर 3 इसम यांनी अगोदर माझे चुलते मंगेश काळोखे उर्फ आप्पा यांचा पाठलाग करुन त्यांना जमीनीवर खाली पाडले व त्यांच्यावर तलवार, कोयता व कु-हाडीने वार करुन जिवे ठार मारले आहे .
तर रविंद्र परशुराम देवकर यांच्यासह धनेश देवकर, सुधाकर परशुराम घारे व भरत भगत यांनी या खुनाचा कट रचला आहे. तरी रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, सचिन संदिप चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, प्रवक्ते भरत भगत तसेच रविंद्र देवकर याचा बाउंसर व इतर अनोळखी 3 इसम यांनी पूर्व-वैमनस्यातुन व राजकीय वादातुन माझे चुलते मंगेश सदाशीव काळोखे ऊर्फ आप्पा, वय-४५ वर्षे, रा. साईबाबानगर, रहाटवडे, खोपोली, ता.खालापुर, जि. रायगड यांना कट रचुन, तलवार, कोयता व कु-हाडीने वार करुन जिवे ठार मारले म्हणुन माझी त्यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.
शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलिसांना मिळाले नसल्यामुळे महिलांनी आक्रोश केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
