कोकण दिंडीचे बोरघाटात भक्ती भावाने स्वागत
माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांची परंपरा कायम
तर कोकण दिंडीसाठी सभामंडप उभारणार कुलदिपक शेंडे यांचे अश्वासन

खोपोली - प्रतिनिधी
संतांनी दिलेला अध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे.आळंदी येथे माऊलीच्या समाधी दिना निमित्ताने समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार आहे. असून वारकरींच्या आदरतीर्थ्यासाठी खोपोली नगरपालिका, पोलीस प्रशासन सह विविध राजकीय, सामाजीक संस्था, मंडळे आनंदाने समाविष्ट होत आहेत. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी यात कोकणातील वारकरीही मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. खालापूर तालुका सहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी मागील दोन तीन दिवसांपासून खोपोलीला मुक्काम करुण मायुलीच्या गावाला निघत आहेत. खोपोली मुक्कमी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्याचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे मित्र परिवाराने जोरदार स्वागत करीत चहापानाची व्यवस्था बोरघाटात केली.
कोकणातून येणाऱ्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी राहण्यासाठी सभामंडप उभारून शौचालयासह सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकल्प असल्याचे माजी उपनराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांनी बोलताना सांगितले.
माउलीच्या गावी जावून मनोभावे भक्ती व दर्शन घेण्यासाठी रायगड मधील दीडशेच्यावर पायी दिंड्या व हजारो वैष्णवांनी खोपोलीला मुक्काम करुण आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण सुरु केले आहे. यात खालापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून दहा हजाराच्यावर वारकरी समाविष्ठ आहेत. माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचलित भैरवी शिक्षण विकास संस्था मुळगांव व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दरवर्षाप्रमाणे दिड्यांचे मनोभावे स्वागत करून चहापानाची व्यवस्था केली होती.दरवर्षी शेंडे कुटंबिय दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करतात म्हणून रामदास शेंडे आणि कुलदिपक शेंडे यांचे श्रीफळ देवून सन्मान केला.
मी नगराध्यक्ष असताना पुण्यात गेलो होतो.त्यावेळी वाकऱ्यांसाठी व्यवस्था आणि स्वागत पाहून आपण कोकण दिंडीचे खोपोलीत स्वागत केले पाहिजे अशी संकल्पना ३० वर्षापुर्वी केली होती.आजही ती परंपरा चालू असून कुलदिपक आणि केतन दोघंही ती परंपरा कायम ठेवत सहभागी होतात याचा मनस्वी आनंद आहे.
