Uncategorized

स्वराज मित्र मंडळाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उदंड प्रतिसाद वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी


खोपोली – प्रतिनिधी

खोपोली (मोगलवाडी) येथील स्वराज मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन व मंडळाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण १२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खोपोलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री कुलदीपक रामदास शेंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मा. नगरसेविका सौ. अश्विनीताई पाटील, आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष श्री प्रभाकर दत्तात्रेय देशमुख, नगरसेवक किशोर अनंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभा प्रभाकर देशमुख, नगरसेवक अविनाश किर्वे, नगरसेवक दिनेश थोरवे, नगरसेवक विनायक तेलवणे, नगरसेवक अनिल सानप नगरसेविका सौ. अश्विनी प्रल्हाद अत्रे यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
गट क्र. १ (इ. १ ली ते ४ थी)
प्रथम – कु. आरोही अमित पवार (खोपोली)
द्वितीय – कु. आरोही शेखर पाटील (अलिबाग)
तृतीय – कु. पियुष धीरज दिघे (वावोशी)
उत्तेजनार्थ – कु. ऋचा संदीप सानप (रसायनी),
उत्तेजनार्थ कु. प्रीत विशाल यशवंतराव (खोपोली)
गट क्र. २ (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम – कु. निधी शैलेश गंभीर (खोपोली)
द्वितीय – कु. हर्षिता अनंत खांडेकर (पनवेल)
तृतीय – कु. तनिष्का प्रदीप देशमुख, खोपोली
उत्तेजनार्थ कु. हर्ष सुनील जाधव (खोपोली)
उत्तेजनार्थ – कु. आर्या अंकुश देशमुख (खोपोली)
गट क्र. ३ (इ. ८ वी ते १० वी)
प्रथम – कु. स्मित कुंदन मोकल (पनवेल)
द्वितीय – कु. आदिती विलास भोईर (पनवेल)
तृतीय – कु. सिद्धी श्रीकृष्ण आगाशे (खोपोली)
उत्तेजनार्थ – कु. अविष्कार प्रकाश शेजवळ, खोपोली
उत्तेजनार्थ कु. वैदेही प्रवीण लाले (खोपोली)
खुला गट
प्रथम – कु. प्राजक्ता संतोष सागवेकर (पेण)
द्वितीय – कु. अनन्या संतोष वानखडे (खोपोली)
तृतीय – कु. रोशनी नारायण सावंत (पेण)
उत्तेजनार्थ – कु. वरदा मदन ओक, खोपोली
उत्तेजनार्थ कु. शुभांगी जितेंद्र शेळके (खोपोली)
बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ वक्ते श्री उल्हास देशमुख, सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पाटील, आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष श्री प्रभाकर देशमुख , नगरसेवक संदीप पाटील नगरसेविका श्वेला आहीर सामाजिक कार्यकर्ते कल्पेश लवंशी ,श्री रवींद्र म्हात्रे,श्री प्रभाकर देशमुख, श्री प्रवीण चितळकर पत्रकार भाई ओव्हाळ, आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेसाठी सर श्री अजय भोईर, श्री विशाल उशिरे, श्री सुधाकर भट, श्री पोटे, श्री ओंकार खंडागळे, सौ. रश्मी म्हामुणकर व सौ. रेश्मा देशमुख यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप देशमुख, श्री आकाश क्षीरसागर, श्री प्रवीण पवार, श्री सुनील पाटील, श्री विनीत पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेश्मा प्रदीप देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री सुनील जाधव यांनी मानले.

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button