Uncategorized

ग्रामपंचायत बोरगाव व वरोसे – आंबेवाडी हद्दीतील जवळपास 270 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांचा पुढाकार

खोपोली – योगेश वाघमारे

   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खालापूर तालुक्यातील ग्रामीण चौक परिसरामधील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव खुर्द व ग्रुप ग्रामपंचायत वरोसे - आंबेवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील जवळपास 270 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चौक जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या माध्यमातून 22 नोव्हेंबर रोजी वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     यावेळी खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, विभागप्रमुख प्रफुल विचारे, माजी जिल्हा परिषद सभापती दामू खैर, मनोहर देशमुख, सुनिल प्रबलकर, निखिल मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, सुबोध पाटील, प्रकाश जाधव, रामदास काईनकर, अनिकेत गायकवाड, दीपाली खैर, जनार्दन चौधरी, कमल भस्मा, वैशाली खैर, विष्णू खैर, राम भस्मा, भिकु भस्मा, महेश बांगारा, संदिप भस्मा, सखाराम चौधरी, तुळसाबाई चौधरी, दिपा हंबिर, चंद्रशेखर शिंदे, बाळु भालसिंग, संजय नागरे, शिल्पा लवांडे, काळू गायकर, अशोक राठोड, चांगु पिरकड, संतोष लवांडे आदी प्रमुखांसह मोठ्या विद्यार्थी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांनी दिलेली 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ब्रीद वाक्याचे शिवसैनिक तंतोतंत पालन करत असताना चौक जिल्हा परिषद वार्डाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात शैक्षणिक साहित्य करत असताना 22 नोव्हेंबर रोजी चौक परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव खुर्द व ग्रुप ग्रामपंचायत वरोसे – आंबेवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील जवळपास 270 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सामाजिक बांधील की जपल्याने शिवसेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चौकट –

शिवसेना प्रमुखांनी दिलेली सामाजिक कार्याची शिकवण ही पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पार पडत असताना ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात हातभार लागावा म्हणून ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव खुर्द व ग्रुप ग्रामपंचायत वरोसे – आंबेवाडी हद्दीतील 270 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

प्रफुल्ल विचारे, विभागप्रमुख

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button