Uncategorized

समाजसेवक रामचंद्र पुकळे आणि आनंदराव कचरे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर…
9 नोव्हेंबरला पार पडणार पुरस्कार सोहळा…

खोपोली – दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख तथा समाजवेक रामचंद्र पुकळे आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष तथा समाजसेवक आनंदराव कचरे या दोघांना ईगल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
रायगड जिल्हातील शेलू येथील रहिवासी असलेले रामचंद्र पुकळे आणि आनंदराव कचरे हे बेळवडे हवेली, ता कराड जी सातारा येथील आहेत मात्र हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्हात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या माध्यमातून गोर गरीब समाज बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत तर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी शिकून शिक्षणात क्रांती घडावी यासाठी समाजतील वाड्या वस्त्यावर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत, तर दोघांच्या माध्यमातून पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात शेलू येथे पार पडते
त्यामुळे या दोघांच्या समाज कार्यांची ईगलं फाउंडेशनने दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी 9 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ अण्णासाहेब डांगे इंजिनियरिंग कॉलेज आष्टा सांगली येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे
या दोघांना पुरस्कार जाहीर होताच सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत..

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button