Uncategorized

खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून निजामुद्दीन जळगांवकर निवडणुक लढणार

खोपोली – योगेश वाघमारे


खोपोली शहरातील शास्त्री नगर सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते निजामुद्दीन जळगांवकर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित केल्याने निजामुद्दीन जळगांवकर यांच्या निर्णयाचे प्रभाग क्रमांक १२ मधील मतदारांनी स्वागत करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निजामुद्दीन जळगावकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रगल्भ अनुभव आहे. 2016 साली ते नगर परिषदेच्या सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्याआधी 2011 च्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती फरजाना जळगावकर या प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या परिवाराला प्रभागातील जनतेचा चांगला विश्वास आणि पाठिंबा लाभलेला आहे.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून निजामुद्दीन जळगावकर यांनी अनेक उपक्रमांतून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांमध्ये त्यांनी मानद पदे भूषवून सक्रिय योगदान दिले आहे.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून निजामुद्दीन जळगावकर यांनी या निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला आहे. त्यांचे प्रभाग क्रमांक 12 पुरताच नव्हे तर संपूर्ण खोपोली शहरात विस्तृत नेटवर्क आणि जनसंपर्क आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, निजामुद्दीन जळगावकर यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक चुरशीची स्पर्धेची ठरण्याची शक्यता असून विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button