प्रभाग क्रमांक 6 मधून जयश्री प्रवीण गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात.
प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

खोपोली – प्रतिनिधी
खोपोली नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 6 मधून अभ्यासू, हुशार सामाजिक कार्याची आवड असलेल्या सौ.जयश्री प्रवीण गायकवाड या इच्छुक उमेदवार असून प्रभागाचा विकास घडविण्याचा मानस घेऊन प्रभाग क्रमांक 6 मधून निवडूकीच्या रंगणात उतरल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व उभरते कणखर नेतृत्व समजले जाणारे त्यांचे पती प्रवीण गायकवाड त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. जयश्री गायकवाड यांना समाज कार्याची आवड घरातूनच मिळाली आहे. सामाजिक कर्यकर्त्या सौ. जयश्री प्रवीण गायकवाड प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजताच प्रभाग क्रमांक 6 मधील विभागातील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग क्रमांक 6 मधील खालची खोपोली येथे रहाणारे जयश्री गायकवाड कुटुंब नेहेमीच जनसेवेस तत्पर असतात. सामाजिक, क्रीडा, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे कणखर नेतृत्व समजले जाणारे प्रवीण गायकवाड यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे. या प्रभागातील तरुणांचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.प्रवीण गायकवाड व त्यांच्या पत्नी जयश्री गायकवाड या सर्व जाती धार्मियांच्या उत्सवात सहभागी होतात. लोकसेवेचा वसा घेऊन ते प्रभागात विकास कार्य करत आहेत. प्रभागात बदल घडवण्याचा त्यांचा मानस आहे.
आपल्या कार्यातून ते नेहमीच गोर गरीब, गरजू नागरिक, विद्यार्थी, व महिला भगिनींसाठी सक्षमीकरण असे हिताचे व महत्वाचे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत असतात.तसेच कोरोना काळात आपला जीव धोक्यात टाकून गोरगरिबांना अन्नदान करुन सामाजिक बांधिलकी जपली होती.म्हणूनच सतत हसतमुख, अतिशय नम्र स्वभावाचे, सर्वांचा आदर ठेवणारे प्रवीण गायकवाड त्यांच्या
सर्व कार्यात सौ. जयश्री गायकवाड या त्यांच्या बरोबरीने असल्याने सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात उतरून दिशाहीन प्रभागाला विकास कार्यातून दिशा देण्यासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तरुणांचे आधारस्तंभ व प्रभागात त्यांचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याने प्रभागातील माय बाप मतदार, मित्र परिवाराच्या सहकार्यातून समाजकार्य करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्या अभ्यासू, हुशार सामाजिक कार्याची आवड असलेल्या त्यांच्या पत्नी सौ.जयश्री गायकवाड या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडूकीच्या मैदानात उतरणार आहेत.
त्यांच्या रूपाने प्रभागात बदल घडविणारी जनसेविका म्हणून नवीन चेहरा मिळणार, म्हणूनच त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
